पुणे वधु वर सूचक केंद्राची सुरुवात ६ डिसेंबर २००१ रोजी झाली. राज्यव्यापी वधू वरचा भव्य मेळावा घेऊन पुणे वधू वर सूचक केंद्राची सुरुवात झाली.
वेळ, पैसा, श्रम, वाचावे एकाच वेळी स्थळे बघता यावीत पत्रिका मॅच करून घ्यावी . वधू वराजवळ प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळावी. वय, उत्पन्न, शिक्षण, अपेक्षा, उंची, फॅमिली बॅकग्राउंड, मॅच करून आपल्या अपेक्षा प्रमाणे स्थळे देण्याचा प्रयत्न केला जातो.
संस्थातर्फे समुपदेशाचे काम श्री कळसेकर सर, केळकर काका करतात. त्याच बरोबर स्थळाची चौकशी करणे दिलेली माहिती बरोबर आहे किवा नाही तसेच नोकरी, हुद्दा, उत्पन्न बिझनेसमनसाठी ३ वर्षाची आयटी(रिटर्न) कागदपत्रे तसेच नोकरी करण्यासाठी सॅलरी स्लीप प्लॅट स्वताचा आहे किवा नाही ह्यासाठी इंडेक्स वगैरे कागदपत्र तसेच त्यांच्या सवयी इत्यादी गोष्टीची सर्व सत्य माहिती वधू वरणा त्याच्या पालकांना देण्याचा प्रयत्न असतो. |